राजेगाव, ता.१३ : राजेगाव (ता. दौंड) येथे लक्ष्मण नेमाणे यांच्या एआय तंत्रज्ञानावरील ऊस पिकाची पाहणी करण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संचालक मंडळ व अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संचालकांनी पीक, एआय तंत्रज्ञानातील स्वयंचलित हवामान केंद्र, माती परीक्षण सेंसर, फवारणी यंत्रणांची पाहणी केली व मोबाइलवर तंत्रज्ञान समजून घेतले.
बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बारामती ॲग्रो यांच्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढवून खर्चात बचत होणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. राजेगावातील दहा शेतकऱ्यांनी ऊस पिकास एआय तंत्रज्ञानाची जोडणी केली आहे.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अॕड. प्रदीप वळसे पाटील, संचालक रामचंद्र ढोबळे, अशोक घुले, दौंड तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सागर जाधव, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित, मंदार गावडे, नितीन जावळे, सोपान चोपडे, बारामती ॲग्रोचे गटप्रमुख गणेश जाधव आदी उपस्थित होते.
बारामती अॕग्रोच्या मदतीने आम्ही ऊस पिकासाठी पहिल्यांदा एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे वेळोवेळी मोबाइलद्वारे संदेश येऊ लागल्याने ऊसशेतीला ड्रीपद्वारे पाणी किती द्यायचं? खत व्यवस्थापन कसं करायचं? रोग येणे अगोदरच रोग व किडींचे नियोजन कसं करायचं? याचं अगोदरच नियोजन करता आले. माझ्या उत्पादनांमध्ये निश्चितच ३० टक्के वाढ होईल.
- लक्ष्मण मेमाणे, प्रयोगशील शेतकरी, राजेगाव, ता. दौंड
01399