छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी करण्यात येत आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल.
पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा आणि ऐतिहासिक तुरा रोवला जातोय.
पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
पिंपरी चिंचवड़ महानगर पालिकेतर्फ़े ही शंभुसृष्टी साकारली जात आहे. बोराडेवाड़ी - मोशी परिसरातील या शंभुसृष्टीत ब्रॉंज धातूचा 100 फुटी पुतळा, 40 फूट उंच चौथरा, सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा शिल्प, 16 सेनापती-मावळ्यांचे पुतळे आणि महाराजांचा इतिहासावर प्रकाश टाकला जाणार आहे.
यासाठी महापालिकेकडून तब्बल 48 कोटींचा खर्च केल जात आहे. अद्याप आणखी काम शिल्लक आहे. मात्र अनेक शिवभक्त एकत्रित येत छत्रपती संभाजी महाराजांना ऐतिहासिक मानवंदना देणार आहेत.
उद्या रविवारी दुपारी तीन वाजता 3000 ढोल, 1500 ताशे आणि 500 ध्वज असं एकत्रित वादन केलं जाणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा पाहून डोळे अशरक्ष टिपून जातील. छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा लवकरच बांधून पूर्ण होईल.