भोर, ता. १३ : येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि समविचारी संस्थांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (ता. १४) सकाळी करण्यात येणार आहे.
शहरातील श्रीपतीनगरमधील डॉ. गोरेगावकर हॉस्पिटलच्या विठाई वाचनालयाच्या सभागृहात रविवारी सकाळी ११ वाजता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ ॲड. महेंद्र कवचाळे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली. यावेळी भोरचे पहिले खासदार बाळासाहेब साळुंके प्रतिष्ठानचे कश्यप साळुंके हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कवी नितीन चंदनशिवे आणि उद्योजक सचिन गजरमल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्य शासनाचे माजी सचिव गोविंद रणखांबे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, कलावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद धिवार, रविराज दूधगावकर, वंदना गायकवाड, करण गायकवाड, हसीना शेख, राहुल गायकवाड, डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. प्रदीप पाटील, कॉ. ज्ञानोबा घोणे, अरुण डाळ, अशोक शिंदे, सविता कोठावळे, राजन घोडेस्वार आदी उपस्थित राहणार आहेत.