सागरी पर्यटनाचे नवी मुंबई केंद्र
esakal September 14, 2025 05:45 PM

सागरी पर्यटनाचे नवी मुंबई केंद्र
बेलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय मरीना प्रकल्पाला मंजुरी
वाशी, ता. १३ (बातमीदार) ः आंतरराष्ट्रीय दर्जाचा मरीना प्रकल्प नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर १५ येथे होणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठीच्या सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्याने सागरी पर्यटनाबरोबर नवी मुंबई शहराच्या लौकिकातही भर पडणार आहे.
महाराष्ट्रातील पहिल्याच मरीना प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या प्रगतिशील उपक्रम यादीतील एक उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या पर्यटन नकाशावर नवी मुंबई शहराचे नवे स्थान निर्माण होणार आहे. यामुळे सागरी पर्यटनाला चालना मिळून नवी मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजेच मरीना क्षेत्रातील रोजगार तसेच व्यवसायाच्या संधींमध्ये वाढ होणार आहे.
------------------------------------
नव्या रोजगाराची संधी
जलक्रीडा, जलपर्यटन आणि इतर सुविधा उपलब्ध झाल्याने प्रगत पायाभूत सुविधा आणि आधुनिक सोयीसुविधांमुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलक्रीडापटू नवी मुंबईतून तयार होणार आहेत. या मरीनाच्या माध्यमातून नवी मुंबईला केवळ पर्यटनाच्या नकाशावरच नव्हे, तर जागतिक स्तरावरील सागरी क्रीडा आणि व्यवसायासाठी विशेष ओळख निर्माण आहे. तसेच स्थानिक युवकांना नव्या रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.