नागपूर : घरफोडीपेक्षा चोरट्यांना एटीएम फोडणे अधिक सोपे असल्याचे दिसून येत आहे. थोड्या मेहनतीत भरभक्कम पैसे हाती लागण्याची हमी असल्याने मागील पाच वर्षांत शहरातील तब्बल ४२ एटीएम फोडण्यात आले आहेत.
यातून ५० लाख ४७ हजार रुपयांची रोख लुटली गेली. २०२१ पासून सप्टेंबर २०२५ पर्यंत एटीएममधून रोकड लंपास होणे आणि इतर कारणांवरून एकूण ५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १९ आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे.
Chh. Sambhajinagar: पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर २ तास रास्ता रोको आंदोलन; वाहनांची लांब रांगाशहरात ४ सप्टेंबर रोजी जरीपटक्यातील एक एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील ८ लाख १४ हजार रुपये लंपास करण्यात आले. या घटनेचा मागोवा घेतला असता २०२१ मध्ये एटीएममधून चोरीच्या १७ गुन्ह्यांत ३६ लाख ३७ हजार रुपये लुटून नेण्यात आल्याची माहिती मिळाली. यातील ७ गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आरोपींचा छडा लावला. मात्र, एकही रुपया जप्त करता आला नाही. एकूण १३ आरोपींना यात अटक करण्यात आली.
नंतरच्या वर्षी २०२२ मध्ये १४ गुन्ह्यात ६ लाख ७५ हजार रुपये लुटण्यात आले. त्यापैकी ५ गुन्ह्यांचा मागोवा घेत ५ लाख २० हजार रुपये जप्त करण्यात येऊन ११ आरोपींना अटक झाली. २०२३ मध्ये केवळ एक गुन्हा दाखल झाला. त्यात ३२ लाख रुपयांची लूट झाली होती. २०२४ मध्ये अजनी, पाचपावली, सक्करदरामध्ये प्रत्येकी एक तर हुडकेश्वरमध्ये दोन एटीएम फोडण्यात आले.
त्यातून ४० लाख रुपये लुटण्यात आले. पोलिसांनी पाचही प्रकरणाचा तपास करीत सात आरोपींना अटक केली. २०२५ मध्ये पाच घटनांमध्ये १० आरोपींना अटक करण्यात आली. या वर्षात एटीएममधून ३० लाखांची रोकड लंपास करण्यात आली. मात्र, जप्तीचा आकडा लाखातही नाही.
९० टक्के एटीएम सुरक्षारक्षकाविनाशहरात ९०० पेक्षा अधिक एटीएम आहेत. यापैकी बहुतांश एटीएमजवळ सुरक्षारक्षक नसतात. मात्र, बॅंकाकडून एटीएममध्ये पुरेशी व्यवस्था असल्याचे सांगण्यात येते. मात्र, लुटारू टोळ्यांकडून एटीएम सर्रास फोडले जात असल्याने हा दावा फोल असल्याचे स्पष्ट होते.
Gadchiroli Bus Accident : बस फलाट ओलांडून प्रवाशांमध्ये घुसली; अचानक झाले ब्रेक फेल, तिघे जखमीवर्ष घटना लुटलेली रक्कम जप्त रक्कम अटक आरोपी
२०२१ १७ ३६ लाख ३७ हजार शून्य १३
२०२२ १४ ६ लाख ७५ हजार ९०० ५ लाख २० हजार ६८० ११
२०२३ ०१ ३२ लाख ४० हजार शून्य शून्य
२०२४ ०५ १३ लाख २२ हजार ३ लाख ३५ हजार ०७
२०२५ ०५ २५ लाख ६२ हजार ७३ हजार ०४५ ०५