- rat१२p८.jpg -
२५N९०९९४
साखरपा : निवारा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना चक्रभेदीच्या वैदेही सावंत आणि पदाधिकारी.
विधवा, एकल महिलांसाठी निवाराकेंद्र
साखरपा येथे सुविधा ; चक्रभेदी फाउंडेशनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १३ : चक्रभेदी सोशल फाउंडेशन या संस्थेतर्फे साखरपा परिसरातील निराधार, एकल आणि विधवा महिलांसाठी निवाराकेंद्र सुरू केले असून, त्याचे उद्घाटन देवरूख पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नेहा माने यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी संस्थेच्या संस्थापिका वैदेही सावंत यांनी या उपक्रमाची गरज आणि उद्देश विषद केला. महिलांना त्यांच्या हक्काचा आणि मायेचा निवारा मिळावा, या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केल्याचे सावंत यांनी सांगितले. साहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी अशा सेवाभावी वृत्तीची समाजाला गरज असल्याचे सांगून त्यांनी सावंत यांच्या कार्याचा गौरव केला. नेहा माने यांनी समाजातील विधवा आणि एकल महिलांबाबत होत असलेल्या अनिष्ट प्रथा चक्रभेदी मोडून काढत असल्याबाबत कौतुक केले. यशस्वी पुरुषामागे स्त्री असते; पण इथे स्त्रियांच्या पाठी सावंत यांच्या रूपात स्त्रीच उभी राहिली आहे, याचे कौतुक केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुधीर चाळके, नीलेश चव्हाण, आरती बने, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार, रावसाहेब चौगुले, युयुत्सू आर्ते आदी उपस्थित होते.