-rat१३p२.jpg-
P25N91225
चिपळूण ः तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र यादव यांचा सत्कार करताना उपसरपंच अभिजित खताते व पदाधिकारी.
---------
खेर्डी तंटामुक्त समिती
अध्यक्षपदी हरिश्चंद्र यादव
चिपळूण, ता. १३ ः जिल्ह्यातील प्रतिष्ठित व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र यादव यांची एकमताने निवड करण्यात आली.
खेर्डी ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. सर्वांना विश्वासात घेत काम करण्याचे आश्वासन यादव यांनी दिले. या वेळी सरपंच सुगंधा माळी, उपसरपंच अभिजित खताते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी उपसरपंच विनोद भुरण, सदस्य विजय शिर्के, अपर्णा दाते, अश्विनी पंडित, सुप्रिया उतेकर, सचिन मोहिते, सुनील मेस्त्री, माजी सरपंच अजित खताते, विजय यादव, अनंत भुरण, काशिनाथ दाते, राजेंद्र शिंदे, वासुदेव सुतार आदी उपस्थित होते.