आपण बऱ्याचदा पदार्थ पॅकिंग करताना किंवा टीफिनमध्ये देखील पोळी वैगरे घेऊन जाण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल पेपर किंवा बटर पेपरचा वापर करत असतो. अगदी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, प्रत्येकाचे अन्न टिफिनमध्ये अशाचपद्धतीने पॅक केले जाते. काही लोक अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल वापरतात, तर काही लोक त्यांचे अन्न बटर पेपरमध्ये गुंडाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या दोन पर्यायांपैकी एक तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो?
अन्न पॅक करण्यासाठी काय वापरावे चांगले?
तुम्हाला माहितीये का की, अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा पॅकिंगसाठी बटर पेपर हा एक चांगला पर्याय आहे. खरं तर, अॅल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये अन्न गरम राहतं पण त्यात असे गरम अन्न पॅक करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.कसं ते जाणून घेऊयात.
जेव्हा गरम अन्न अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळले जाते तेव्हा फॉइलमध्ये असलेले काही कण अन्नात त्याच्या गरमपणामुळे त्या अन्नात मिसळू शकतात. जे तुमच्या आरोग्याला नक्कीच हानी पोहोचवू शकतात. अॅल्युमिनियम फॉइल अन्नासोबत त्या कणांची प्रतिक्रिया होऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही असे अन्न खाता तेव्हा त्यामुळे पोटाच्या आरोग्यावर, हाडांच्या आरोग्यावर आणि मेंदूच्या आरोग्यावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जे कोणी अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल वापरतात त्यांनी ते वापरणं ताबडतोब बंद करावं अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
बटर पेपरमुळे काही नुकसान होऊ शकते का?
सेल्युलोजपासून बनवलेला बटर पेपर आरोग्याला हानी पोहोचवत नाही. जर तुम्ही अन्न पॅक करण्यासाठी बटर पेपर वापरला तर अन्नातील अतिरिक्त तेल उलट त्या पेपरमुळे शोषले जाते.तसेच त्याची अन्नासोबत कोणतीही प्रतिक्रिया होत नाही. याशिवाय, बटर पेपर अन्नात ओलावा जाण्यापासून देखील रोखतो. एकंदरीत, बटर पेपर अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा अनेक पटीने चांगला मानला जातो. त्यामुळे फॉइलपेक्षा बटरपेपर वापरणे कधीही चांगले.
बटर पेपरमध्ये कोणते पदार्थ पॅक करू शकतो?
दरम्यान बटर पेपरमध्ये तुम्ही मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, पराठे, रोटी सहजपणे पॅक करू शकता. इतकेच नाही तर हा पेपर अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा जास्त तापमान देखील सहन करू शकते, म्हणून तुम्ही त्यात गरम रोटी, पराठे देखील पॅक करू शकता. त्यामुळे अन्न पॅक करण्यासाठी बटर पेपर वापरा आणि प्लास्टिकच्या कंटेनरऐवजी काचेच्या कंटेनरमध्ये तुमचे अन्न पॅक करू शकता. कारण त्यामुळे तुमचे अन्न प्लास्टिकशी प्रतिक्रिया करू शकते पण काचेसोबत नाही. याशिवाय, तुम्ही सिलिकॉन कंटेनर देखील वापरू शकता.