सायमन मार्टिन यांना पुरस्कार जाहीर
विरार ता.१३ (बातमीदार) : तळ कोकणातील नाट्यकर्मिनीएकत्र येत नाटक व चित्रपट साहित्य आणि चळवळ यांच्यासाठी पुरस्कार योजना यावर्षीपासून चालू केली आहे. दीप तारांगण क्रिएशन्स या संस्थेतर्फे हे पुरस्कार घोषित करण्यात आले असून ज्येष्ठ लेखक भाऊ उपाध्ये पुरस्कार जेष्ठ कवी वसईतील शिवसेनेचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल वसई शिवोवसेनेच्या वतीने मार्टिन यांचा आज सत्कार करण्यात आला.
दीप तारांगण क्रिएशन या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी पहिला मान वसईला मिळाला त्याबद्दल वसईतील सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. त्याबद्दल आज वसई तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातर्फे तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत विधानसभा संघटक शशी भूषण शर्मा शहर प्रमुख संजय गुरव यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सायमन मार्टिन यांचा सत्कार केले.