बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील आरोपी नर्तिका पूजा गायकवाड सध्या तुरुंगात आहे. न्यायालयाने अगोदर तिला तीन दिवसांची कोठडी दिली होती. आता या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
नर्तिका पूजा गायकवाड ही कला केंद्र नृत्य सादर करायची असे सांगितले जाते. अशाच एका कला केंद्रात गोविंद बर्गे आणि पूजा यांची ओळख झाली होती. नंतर या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले.
पूजा टाळत असल्याने समजावण्यासाठी गेलेल्या गोविंद बर्गे यांनी कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून घेतली. या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. गोविंद बर्गे विवाहित आहेत. त्यांना दोन आपत्यं आहेत. त्यामुळे आता पोरक्या झालेल्या लहान लेकरांकडे पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्यानंतर पूजा गायकवाडची महाराष्ट्रभर चर्चा झाली. अनेकांनी तिचे इन्स्टाग्राम या सोशल मिडियावरील अकाऊंट शोधून काढले. तिने तिच्या खात्यावर डान्सचे काही व्हिडीओ अपलोड केले होते. तिच्या याच व्हिडीओंची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
काही लोक या व्हिडीओंवर कमेंट्सही करत आहेत. तिच्या अशाच एका व्हिडीओला चाळीस हजार लाईक्स मिळाले आहेत. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या प्रेमात आत्महत्या केल्याचे म्हटले जात असले तरी आता पूजा गायकवाड मात्र सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण समोर येण्याआधी पूजाच्या खात्यावर अवघे चारशेच्या जवळपास फॉलोअर्स होते. आता तीन दिवसांत तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्सची संख्या थेट 38 हजारांच्याही पुढे जाऊन पोहोचली आहे. प्रत्येक मिनिटाला पूजाचे फॉलोअर्स वाढत आहेत.