रत्नागिरी- अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन
esakal September 15, 2025 11:45 AM

‘अभ्यंकर- कुलकर्णी महाविद्यालयात शिक्षक दिन
रत्नागिरी, ता. १४ : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दिनविशेष समितीतर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी लेख, त्यांचे चित्र तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यातील शिक्षकांचे महत्त्व पटवून देणारे लेख भित्तीपत्रकाच्या माध्यमातून कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी या चारही विभागांमध्ये प्रदर्शित करण्यात आले.
उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, चारही विभागांचे प्रमुख आणि लेखन करणारे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनविशेष समितीच्या प्रमुख मनस्वी लांजेकर आणि इतर सर्व सदस्यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.