खुटबाव, ता. १४ : ‘‘देशाच्या विकासामध्ये शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. आजच्या काळातील बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पामध्ये शिक्षणावरील आर्थिक तरतूद वाढवण्याची गरज आहे,’’ असे मत शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. खुटबाव (ता. दौंड) येथे दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, टीडीएफचे राज्य अध्यक्ष जी. के. थोरात, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, रामचंद्र नातू यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सयाजी ताकवणे, भाऊसाहेब ढमढेरे, पोपटराव ताकवणे, कुंडलिक खुटवड, अरुण थोरात, सूर्यकांत खैरे, संजय वाबळे, प्राचार्य राजेंद्र जगताप, बी. डी. शितोळे आदी उपस्थित होते. दौंड तालुका अध्यक्ष सुनील ताकवणे यांनी प्रास्ताविक, तर नवनाथ सोनवणे व लाला साळवे यांनी सूत्रसंचालन केले. काकासाहेब ढवळे यांनी आभार मानले.अध्यक्ष नामदेव खडके, प्रा. सुनील राजे निंबाळकर, सोमनाथ लवंगे, सुभाष फासगे, राजेंद्र रंधवे, नीता हंडाळ, हनुमंत थोरात, सुवर्णा डोरले, संतोष दोरगे यांनी संयोजन केले.