17 सप्टेंबरपासून कन्या राशीत बुधादित्य योग, तीन राशींवर होणार बुध आणि सूर्याची कृपा
Tv9 Marathi September 15, 2025 11:45 AM

गोचर कुंडलीनुसार 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच कन्या संक्रांती होणार आहे. याच राशीत पुढे सूर्यग्रहणाचा योग जुळून येणार आहे. असं असताना सूर्यग्रहणापूर्वी सूर्य आणि बुधाची युती कन्या राशीत होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होतो. सूर्याच्या अगदी जवळ असलेला ग्रह म्हणजेच बुध.. त्यामुळे सूर्य आणि बुधाची अनेकदा युती होत असते ज्योतिषशास्त्रात हा सर्वात शुभ योग मानला जातो. बुध सूर्यापासून 14 अंश मागे असतो तेव्हा या योगाचा सर्वोत्तम परिणाम दिसून येतो. कुंडलीच्या कोणत्याही घरात हा योग तयार झाला तर त्या व्यक्तीला त्या घराशी संबंधित चांगले परिणाम मिळतात. या स्थितीमुळे तीन राशींना लाभ मिळणार आहे. कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घेऊयात

वृषभ : बुधादित्य योगामुळे या राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ मिळेल. मनासारखी नोकरी मिळू शकते. नोकदार वर्ग कामकाजात व्यस्त राहील. दुसरीकडे, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. व्यवसायातील उत्पन्न चांगलं राहील. आर्थिकदृष्ट्या खर्चाचे नियोजन व्यवस्थित करा. चांगल्या कालावधीत शुभ घटनांचा ओघ सुरु राहील. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या स्वताहून पूर्णत्वास न्या. तुम्हाला फळ मिळेल असं ग्रहमान आहे.

वृश्चिक : या राशिच्या लाभ स्थानात सूर्य आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे करिअर आणि उद्योग धंद्यात प्रगती दिसून येईल. या कालावधीत शुभ आणि चांगला गोष्टी घडतील. कोणावर अवलंबून राहू नका. आपलं काम आपणच करावं हा सिद्धांत पाळा. दुसऱ्याच्या हाती महत्त्वाचं काम सोपवण्याऐवजी स्वत:च केलं तर फळ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून डोक्यावर असलेली चिंता दूर होईल.

धनु : या राशीच्या कर्मस्थानात सूर्य आणि बुध एकत्र येत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास अडचण येणार नाही. काही कामं तुम्ही ठरवाल त्या पद्धतीने होतील . आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक वेळी आपण बोलू तेच खरं असं होत नाही. व्यवसायातील उलाढाल वाढेल. आर्थिकदृष्ट्या खर्च कमी करा आणि समाजसेवा करताना भान ठेवा. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.