GST कपातीने कारचं स्वप्न होणार पूर्ण, Ertiga, Wagon R, Dzire वर किती रुपये वाचू शकतात?
esakal September 15, 2025 12:45 PM

gst slab change maruti suzuki cars price

जीएसटीमध्ये बदल

ऐन सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये मोठे बदल केले. यामुळे स्वप्नातली कार घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

gst slab change maruti suzuki cars price

कारच्या किंमती स्वस्त

अनेक गाड्यांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के झाला आहे. यामुळे गाड्यांवर लागणारा जीएसटी ६०००० ते ७०००० हजार रुपयांपर्यंत कमी झालाय.

gst slab change maruti suzuki cars price

मारुती सुझुकी स्विफ्ट

लोकप्रिय हॅचबॅक कारपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारच्या किंमतीतही मोठा बदल होऊ शकतो. जीएसटी कपातीमुळे या गाडीची किंमत सुमारे ६० हजार ते ९० हजार रुपये इतकी कमी होण्याची शक्यता आहे.

gst slab change maruti suzuki cars price

मारुती सुझुकी वॅगनआर

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक असलेली वॅगनआर कार ५५ हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकते.

gst slab change maruti suzuki cars price

मारुती सुझुकी डिझायर

सेडान कार मारुती सुझुकी डिझायर या कारची किंमतही स्वस्त होऊ शकते. जीएसटी कपात झाल्यास या कारच्या खरेदीत ग्राहकांची ६५ हजार ते ९० हजारांपर्यंत बचत होऊ शकते.

gst slab change maruti suzuki cars price

मारुती सुझुकी अर्टिगा

७ सीटर गाड्यांमध्ये अर्टिगा ही सर्वाधिक खरेदी केली जाणारी गाडी आहे. जीएसटी कपातीमुळे या कारची किंमत ८० हजार ते १.३० लाखापर्यंत कमी होऊ शकते.

gst slab change maruti suzuki cars price

मारुती सुझुकी बलेनो

बलेनो ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये लोकप्रिय असणारी कार आहे. GST दरात कपातीमुळे या गाडीची किंमत ६५ हजार ते ९५ हजारांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

gst slab change maruti suzuki cars price

मारुती सुझुकी अल्टो के१०

देशातल्या सर्वात स्वस्त कारपैकी एक असणाऱ्या अल्टोच्या खरेदीवर तब्बल ४० हजार ते ५५ हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

Bike Challan वाहनाला एका दिवसात किती चलान येऊ शकतं? तुम्हाला माहितीय का? इथं क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.