स्वयंपाकघर हा घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हिंदू धर्मात स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवी वास करत असते असे मानले जाते. स्वयंपाकघरात आपण अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवले जातात. तर हे अन्न आपल्याला शरीरासोबतच आपल्या आत्म्याचेही पोषण करते, म्हणून वास्तूशास्त्र स्वयंपाकघराची दिशा काही गोष्टींचे स्थान तसेच तेथील स्वच्छतेचे विशेष भर देण्यात येते. अशातच वास्तुशास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या स्वयंपाकघरात ठेवू नयेत. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि घरात गरिबी राहते. तसेच स्वयंपाकघरात या गोष्टी ठेवल्याने तुम्हाला वास्तुदोषाचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळेस तुम्ही घरातून या गोष्टी ताबडतोब काढून टाकाव्यात.
अशी भांडी ताबडतोब फेकून द्या
तुटलेली किंवा चिर गेलेली भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नयेत, कारण वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न खाल्ल्याने घरात गरिबी येते. अशा वेळेस अशी भांडी ताबडतोब घरातून बाहेर फेकून द्यावीत.
अशा गोष्टी काढून टाका
वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात खराब झालेले मिक्सर, ओव्हन व इतर कोणतेही इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळेस ही उपकरणे दुरुस्त करावीत किंवा घराबाहेर काढून टाकावीत.
अडचणी वाढू शकतात
अनेकांना शिळे अन्न स्वयंपाकघरात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची सवय असते. परंतु वास्तुशास्त्रात असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. यामुळे तुम्हाला आजार आणि तणाव इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
या गोष्टी ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कधीही आरसा ठेवू नये, कारण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. यासोबतच स्वयंपाकघरात वापरलेले झाडू किंवा कपडे देखील स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे तुम्हाला नकारात्मक परिणाम देखील मिळू शकतात. झाडू नेहमी अशा प्रकारे ठेवा की कोणाचीही नजर त्यावर पडणार नाही. तसेच स्वयंपाकघरात वापरलेले कपडे स्वच्छ ठेवा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)