मावळमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला.
बापू भेगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी भाजपची ताकद मावळमध्ये वाढली.
दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी
Bapu Bhegde joins BJP in Maval Pune : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातील मावळमध्ये मोठा धक्का बसला आहे. बापू भेगडो यांच्यासह शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. सोमवारी सर्व कार्यकर्ते बापू भेगडे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्ष प्रवेश होणार आहे. विधानसभा निवडणुकीत तिकिट न मिळाल्यामुळे बापू भेगडे नाराज होते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बापू भेगडे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची मावळमधील ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर नाराज बापू भेगडे यांना मावळमधील भाजप नेत्यांनी विधानसभेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मावळातील भाजपही बापू भेगडे यांच्या सोबत होता. आता अखेर राष्ट्रवादीचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी घड्याळ सोडून सोमवारी कमळ हातात घेणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय.
PUC Certificate Price : पीयूसीच्या किंमतीत वाढ करा, अन्यथा राज्यव्यापी संपावर जाऊ, फडणवीस सरकारला इशारामिळालेल्या माहितीनुसार, बापू भेगडेआणि कार्यकर्त्यांचा सोमवारी ११ वाजता पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईमधील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापू भेगडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव वायकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सोमवारी भाजपमध्ये प्रवेश आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत युतीचा धर्म पाळला नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून भेडगे यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
caste certificate : जात प्रमाणपत्र मिळत नाही, लातूरमध्ये तरूणाने उचलले टोकाचे पाऊल, शेवटच्या चिठ्ठीत धक्कादायक आरोपबापू भेगडे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माजी मंत्री बाळा भेगडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे समजतेय. बाळा भेगडे यांनी बापू भेगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये स्वागत केलेय. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार बापू भेगडे यांना भाजपचा संपूर्ण पाठिंबा होता. बापू भेगडे यांचं मावळ तालुक्यात चांगलं वर्चस्व आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेले पंधरा वर्ष ते काम करत आहेत. आणि येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांना शह देण्यासाठी भाजपने केलेली ही खेळी असल्याची चर्चा मावळमध्ये सुरू आहे. बापू भेगडे यांच्यामागे शेतकरी अन् सर्वसामान्य मोठा वर्ग आहे. त्यांचा मावळमध्ये दबदबा आहे.
Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर