साडी महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. साडीवर शोभून दिसतील असे दागिने, ब्लाउज खरेदी केले जातात. आता तर नवरात्री सुरू होणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस महिला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात. अशावेळी नऊ रंगाच्या साड्या कित्येकजणींकडे असतात पण, त्यावर मॅचिंग ब्लाउज नसते. कारण अनेक महिला प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाउज शिवणे टाळतात. पण, यामुळे कुठे बाहेर जाताना किंवा नवरात्रीत रंगानुसार साडी नेसताना मोठा प्रश्न पडतो. म्हणूनच दरवेळी प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाउज कुठून आणावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काही टिप्स पाहूयात. हल्ली कॉन्ट्रास्ट रंगसंगती ट्रेंडिगमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही काही विशिष्ट रंगाचे ब्लाउज सर्व साड्यावर घालू शकता.
गुलाबी –
गुलाबी रंगात डार्क, लाईट असे बरेच शेड तुम्हाला मिळतात. तुम्ही हे ब्लाउज प्लेन साड्यांवर घालू शकता. तसेच हिरव्या, पिवळ्या साड्यांवर शोभून दिसतात.
हेही वाचा – Tanning Remedy : हातापायांचे टॅनिंग घालवण्याचे नैसर्गिक उपाय
हिरवा –
या रंगाचे ब्लाउज तुमच्याकडे असायला हवे. कारण बहुतेक साड्यांचे काठ हिरव्या रंगाचे असतात. इतकंच काय तर हिरवा ब्लाउज ऑफ व्हाइट आणि मोती रंगाच्या साडीवर छान दिसते.
काळा –
काळ्या रंगाचे ब्लाउज तुमच्याकडे असायला हवे. कारण काळ्या रंगाचे ब्लाउज सर्वच स्टाइलच्या साडीवर मॅचिंग करता येईल.
सोनेरी –
सोनेरी रंगाचे ब्लाउज कायम रॉयल लूक देते. तुम्ही कोणत्याही फॅन्सी ब्लाउजवर हे ट्राय करू शकता.
जांभळा –
जांभळ्या रंगाचे ब्लाउज सर्व साड्यांवर शोभून दिसते. तुम्ही गुलाबी, मोरपंखी, पिवळ्या साडीवर छान दिसते.
हेही वाचा – Trending Blouse Patterns: फॅन्सी आणि ट्रेंडिंग ब्लाऊज स्लीव्हज पॅटर्न करा ट्राय