डोक्यात मोठा दगड पडला, जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला; माळशेज घाटात तरूणाचा मृत्यू
Saam TV September 15, 2025 10:45 PM
  • माळशेज घाटात दगड कोसळून पर्यटकाचा मृत्यू

  • पुण्याहून आलेल्या ४८ पर्यटकांपैकी एकावर दगड कोसळला

  • मृत पर्यटकाची ओळख हेमंत कुमार सिंग (२३) अशी पटली

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला

मुरबाड तालुक्यातील माळशेज परिसरातून एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील तरूणाचा माळशेज घाटात डोक्यावर पडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी माळशेज घाटात ४८ पर्यटक आले होते. घाटात फिरत असताना अचानक घाटावरून ४ ते ५ मोठ्या दगडी खाली पडल्या. एक दगड पर्यटकाच्या डोक्यात पडला. तो खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या तरूणाला खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा जागीच उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

हेमंत कुमार सिंग(वय वर्ष २३) असे मृत तरूणाचे नाव आहे. काल सायंकाळच्या सुमारास पुण्याहून माळशेज घाटात फिरण्यासाठी ४८ पर्यटक आले होते. माळशेज घाटातील थीतबी या ठिकाणी पर्यटक फिरत होते. यावेळी चार ते पाच दगडी डोंगरावरून खाली रस्त्यावर पडल्या. दगडी आकाराने मोठ्या होत्या.

मुंबईकरांचे मेगाहाल! पश्चिम, मध्य अन् हार्बर लोकलला लेटमार्क, रस्त्यावरही वाहतूककोंडी, मोनो रेल विस्कळीत

यामुळे पर्यटकांची धावधाव झाली. यावेळी एक मोठा दगड हेमंत कुमार सिंग या तरूणाच्या डोंगरावर पडला. यामुळे तरूण क्षणात रक्तबंबाळ होत खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या तरूणाला तातडीने खासगी रूग्णालयात नेण्यात आले. तरूणाच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याला मुरबाड येथील रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

'सर माझी पाठ दुखतेय' सुट्टीचा मेसेज टाकला अन् १० मिनिटांत कर्मचाऱ्याचा मृत्यू, बॉसची पोस्ट व्हायरल

या घटनेनंतर टोकवडापोलिसांना याची माहिती देण्यात आली. या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर सिंग कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, कमी वयात तरूणाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

OMG! एक, दोन नाही...तर मातेच्या कुशीत चक्क 7 बाळं, आधी तिळे आता एकाचवेळी ४ मुलांना जन्म
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.