मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस कमी झाल्याचे चित्र होते. मुंबईमध्ये तर महिन्याभरानंतर अतिमुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मुंबईसह, पुणे आणि रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. अचानक महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचे मोठे कारण हे पुढे आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचे मोठे कारण असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यात पाऊस कोसळतोय. मुंबईत पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच, वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरसह विदर्भ, कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाला आहे. हवामान खात्याने आज मुंबई आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड जिल्ह्याला आज सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण आहे. संभाव्य अलर्ट लक्ष्यात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.
कोकणात पुढील चार दिवस पाऊस कोसळणार आहे. रात्रीपासून कोकणात ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी मात्र पावसाची विश्रांती बघायला मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. काही भागात कमी वेळात जास्त पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस असणारा आहे.
पुणे शहर आणि जिल्हा परिसरात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय तर पुण्याचा घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सहा मंडळात झाली अतिवृष्टीची नोंद;अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत.