OBC Reservation : ओबीसीत एकही नकली व्यक्ती सामाविष्ट होणार नाही; CM देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?
Saam TV September 15, 2025 10:45 PM

ओबीसी यादीत एकही नकली व्यक्ती समाविष्ट होणार नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारच्या GR वरून ओबीसी नेते आक्रमक

विरोधक केवळ राजकारण करत असल्याची टीका फडणवीसांनी केली.

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सरकारच्या जीआरचा सातत्याने विरोध होत आहे. याच वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीत एकही नकली व्यक्ती सामाविष्ट होणार नसल्याचे स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'दोन्ही बाजूंनी यामध्ये राजकारण केलं जात आहे. हा जीआर कुठेही ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणार नाही. एकही नकली व्यक्ती हा ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही, अशी काळजी आम्ही घेतली आहे. विजय वडेट्टीवार यांना तर बोलण्याचा अधिकारच नाही. कारण ओबीसी समाजाकरिता जे काही केलं आहे. ते आमच्या सरकारने केला आहे'.

TET 2025 परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट; अर्ज, परीक्षा शुल्क अन् वेळापत्रकाची माहिती एका क्लिकवर

'२०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाच्या कल्याणाचे झाले. ते आमच्या सरकारमध्ये झाले. आम्ही ओबीसी समाजाचे वेगळे मंत्रालय आणणारे ओबीसी समाजासाठी नव्या योजना तयार करणार आहेत. महाज्योती योजना तयार करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ओबीसींचं घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणार आहोत. ओबीसीला हे माहिती आहे की, त्यांचा हित कोण पाहणार आहेत, असे फडणवीस पुढे म्हणाले.

Car Accident : रिंग रोडवर अपघाताचा थरार, अस्थी विसर्जन करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, २ मुलांसहित ७ जणांचा मृत्यू

'नेत्यांनी माझ्यासोबत खुली चर्चा करावी. आम्ही केलेलं काम आणि इतर सरकारने काम केलेलं. त्यांना केवळ राजकारण करता येतं. आम्हाला ओबीसी समाजाचा हित करायचा आहे. ते आम्ही करणारच आहेत. यासह मराठा समाजासहित देखील आम्हीच करू, असेही देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.