घोटी: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी संशयित आरोपी विश्वास बुधा मांगटे (वय २३, रा. मांजरगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक) याला पुणे येथून अटक केली आहे. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जून २०२५ ला रात्री आठच्या सुमारास घोटी येथील एक पंधरा वर्ष अकरा महिने वयाची अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे करत होत्या.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हवालदार संतोष नागरे, श्रीकांत खैरे व महिला हवालदार नीलम गाडे यांनी चिखली, पिंपरी- चिंचवड येथे जाऊन जाधववाडी परिसरातून संशयित आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीचा विश्वास संपादन करून चौकशी केली असता, संशयिताने तिला बळजबरीने पळवून नेत अत्याचार केल्याची माहिती समोर आली.
School Van Accident: कोराडी मार्गावर स्कूल व्हॅन अपघात; १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, सहा जणांवर गुन्हात्यामुळे या गुन्ह्यात पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संशयित आरोपी विश्वास बुधा मांगटे याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेखा देवरे, हवालदार संतोष नागरे व श्रीकांत खैरे तपास करीत आहेत.