Jalgaon Crime : दोन कुटुंबात जुना वाद उफाळला; हाणामारीत एकाच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
Saam TV September 16, 2025 06:45 AM

जळगाव : गावात असलेल्या दोन कुटुंबांमध्ये जुना वाद उफाळून आला. या वादातून झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर महिलांसह ११ जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील बिलवाडी येथे घडली आहे. दरम्यान यात एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  काही जखमी झाले. 

जळगावतालुक्यातील बिलवाडी गावात घडलेल्या घटनेत एकनाथ निंबा गोपाळ (वय ५५) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून वैमनस्य आहे. तर रविवारी क्षुल्लक कारणातून हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला होता. यात एकनाथ गोपाळ आणि त्यांचे कुटुंबीय व दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद वाढला. यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत गेला होता. 

Paithan Heavy Rain : मुसळधार पावसात संसार क्षणात उध्वस्त; ५४ मेंढ्या, ३ बैलांसह संपूर्ण संसार गेला वाहून, अतिवृष्टीने गोदावरीला अचानक पूर

एकाचा मृत्यू, एकजण गंभीर 

दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. लाठ्याकाठ्या, फळ्यांचा व लाकडी दांडक्यांचा वापर होऊन झालेल्या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही गटांतील काहीजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर सध्या जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Onion Price : दर घसरल्याने कांदा उत्पादक आक्रमक; गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांचा रास्ता रोको

गावात तणावाचे वातावरण 
दरम्यान घटना घडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर मृताचे कुटुंबीय आक्रमक झाल्याने बिलवाडी गावात तणावाचे वातावरण पसरले असून, पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच सकाळपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. शहरात देखील रास्ता रोको केला. मात्र गावांमध्ये जमाव जमल्याने आरोपीच्या घरावरती हमला करण्याचा प्रयत्न झाला पण पोलीस बंदोबस्त असल्याने ह्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.