झी मराठी वाहिनी ही काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राची नंबर १ वाहिनी म्हणून ओळखली जात होती. या वाहिनीने अनेक दमदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. कुटुंबाची कथा असेल किंवा भयकथा प्रत्येक विषयाला अनुसरून एक वेगळा अनुभव या मालिकांमधून प्रेक्षकांना मिळत होता. मात्र आता काही वर्षांपासून झी मराठीचे प्रेक्षक स्टार प्रवाहकडे वळले आहेत. गेल्या काही महिन्यात झी मराठीच्या अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या. आता आणखी एका मालिकेची वेळ बदलल्याने प्रेक्षक चकीत झाले आहेत.
झी मराठीवर महिन्याभरापूर्वीच झोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिका म्हणजे तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि शिवानी सोनारची ‘तारिणी’. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सध्या सायंकाळी ७:३० वाजता ऑन एअर केली जात आहे. तर तारिणी रात्री ९. ३० वाजता दाखवली जाते. या मालिकांसाठी वाहिनीवरील तीन मालिकांची वेळ आधीच बदलण्यात आली होती. सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका ६ वाजता, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका ६:३० वाजता आणि ‘पारू’ मालिका ७ वाजता प्रसारित केली जाते. मात्र, या वेळांमध्ये आणखी एकदा बदल होण्याची शक्यता आहे.
ZEE marathi time changes
झी मराठीने नुकताच नाशिकमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. यात ‘तुला जपणार आहे’ या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर दाखवण्यात आला. याच कार्यक्रमाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ‘तुला जपणार आहे’ची वेळ सायंकाळी ६:३० वाजता अशी नमूद करण्यात आली आहे. हा फोटो वाहिनीच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. मात्र ‘तुला जपणार आहे’ ही मालिका रात्री १०:३० वाजता ‘झी मराठी’वर दाखवण्यात येते. आता १०:३० ऐवजी फोटोमध्ये ‘तुला जपणार आहे’च्या प्रोमोवर ६:३० ची वेळ दिसल्याने याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
हे चुकून झालंय की यामागे झी मराठीचा काही विचार आहे, या मालिकेच्या जागी दुसरी मालिका येणार आहे का, जर येणार असेल तर ६. ३० वाजता लागणाऱ्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेचं काय? ही मालिका निरोप घेणार का? असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडले आहेत. झी मराठीने याबद्दल काहीही पोस्ट केलेलं नाही. मात्र येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल.
मला माझ्या पद्धतीने जगायचंय... सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर? नाम फाउंडेशनही केलं 'या' व्यक्तीच्या स्वाधीन