विद्यामंदिर शाळेत मोफत रक्तगट तपासणी
esakal September 16, 2025 01:45 PM

विद्यामंदिर शाळेत आरोग्याविषयी जागरूकता
शिबिरात १८०० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी
टिटवाळा, ता. १५ (वार्ताहर) : टिटवाळा येथील विद्यामंदिर शाळेत रेड स्वस्तिक सोसायटी आणि स्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे १८०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शनिवारी (ता. १३) सकाळी) ८ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात २५ ते ३० लॅब टेक्निशियन, डॉक्टर, शिक्षक व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. योग्य नियोजन, शिस्तबद्ध कामकाज आणि मुलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करून तपासणी सुरळीत पार पडली.

शिबिरात एक विशेष उपक्रम म्हणून हृदयविकाराच्या झटक्यानंतर आवश्यक असलेल्या प्रथमोपचार विषयावर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण डॉ. पुष्पराज स्वामी यांनी शिक्षक, कर्मचारी व लॅब टेक्निशियन यांना दिले. या उपक्रमाचे यश मुख्याध्यापक दिनेश भामरे, मारुती शिंगोळे, संपूर्ण शिक्षकवर्ग आणि कर्मचारी, तसेच राजकुमार चव्हाण (बदलापूर उपजिल्हा रुग्णालय), वैदेही नांदगावकर (गंधर्व गुरुकुल), शुभम शिर्के, डॉ. अर्चना चव्हाण (गोवेली ग्रामीण रुग्णालय), पूजा मंढारे आणि तन्वी फाटक (देवी महालक्ष्मी ग्रुप, टिटवाळा) यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले.

डॉ. प्रमोद नांदगावकर, डॉ. पुष्पराज स्वामी, दीपिका कांबळे, रवि देसाई, कमलेश बोनावटे आणि मुकुंद नावकर यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला. उपस्थितांनी समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.