Asia Cup 2025 : भारताने पाकड्यांना मैदानातही लोळवले, पण पाक खेळाडूंच्या जर्सीवर उर्दूमध्ये काय होते लिहिले? सोशल मीडियातून का होतेय कौतुक?
GH News September 16, 2025 02:15 PM

Asia Cup 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील आबुधाबी येथील सामन्याला क्रिकेट प्रेमी, काही खेळाडू आणि विरोधकांनी कडाडून विरोध केला. पण हा सामना खेळला गेला आणि पाकिस्तानला टीम इंडियाने लोळवले. पाकिस्तानचा 7 गडी राखून दणदणीत पराभव भारतीय संघाने केला. या दरम्यान मैदानावर खेळण्यासाठी उतरलेल्या पाक संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर अनेकांचे लक्ष गेले. त्या जर्सीवर उर्दू भाषेत (what was written in Urdu on the jersey of Pakistani players) काही तरी लिहिलेले होते. त्याची एकच चर्चा झाली. सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कौतुक करण्यात आले, कारण तरी काय?

बदलाची सोशल मीडियावर चर्चा

सामन्या दरम्यान पाकिस्तानच्या हिरव्या जर्सीकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. ही नवीन जर्सी आहे. या जर्सीवर खेळाडूंच्या क्रमांकाखाली उर्दू भाषेत काहीतरी लिहिलेले दिसले. हा मोठा बदल पहिल्यांदाच समोर आला. त्यामुळे पाकसह उपस्थित अनेकांच्या मनात उर्दू भाषेत नेमकं काय लिहिलं आहे, याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर सुद्धा याविषयीची चर्चा सुरू होती.

काय होते उर्दूत लिहिलेले

याविषयी एक माहिती समोर आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघाच्या जर्सीमध्ये एक मोठा बदल केल्याचे दिसून आले. जर्सीचे डिझाईन बदलण्यात आले. खेळाडूंच्या जर्सीवरील क्रमांकाखाली उर्दू भाषेत पाकिस्तान असे लिहिण्यात आले. हा बदल पाक संघाची राष्ट्रीय ओळख आणि सांस्कृतिक संबंध दर्शवण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी जर्सीवर केवळ खेळाडूचा क्रमांक आणि इंग्रजी भाषेत “Pakistan” असे लिहिलेले होते. यावेळी इंग्रजी ऐवजी उर्दू भाषेला स्थान देण्यात आले.

सामन्या दरम्यान हा बदल कॅमेऱ्यांनी टिपला. जर्सीतील या उर्दू भाषेतील अक्षरांचा अर्थ काय हे गुगलवर सर्च करण्यात आले. समाज माध्यमांवर पीसीबीच्या या बदलाचे कौतुक होत आहे. प्रत्येक देशांनी त्यांची सांस्कृतिक ओळख अशा प्रकारे दर्शवण्याची मागणी अनेक चाहत्यांनी केली. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाचे स्वागत केले. इंग्रजीऐवजी अजून एक स्थानिक भाषा जोडली तर हरकत काय? अशा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.

भारत-पाक सामन्यात पाक संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांना करिष्मा दाखवता आला नाही. अत्यंत वाईट सुरुवात करत पाक संघ 20 षटकांमध्ये 127 धावा करू शकला. तर भारताने हे लक्ष 3 गडी गमावत 15.5 षटकात पूर्ण केले. भारताने पाकचा धुव्वा उडवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.