मान्सून सायकल रॅलीत २०० विद्यार्थ्यांचा सहभाग
esakal September 16, 2025 04:45 PM

मान्सून सायकल रॅलीत २०० विद्यार्थ्यांचा सहभाग
पालघर, ता. १५ ः पालघरमध्ये रोटरी मान्सून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध शाळांमधील २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अमली पदार्थ विरोधी मोहीम उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅली इयत्ता पाचवी ते नववी अशा चार गटांमध्ये होती. प्रत्येक गटामधून प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थीना यश फाउंडेशनकडून प्रत्येकी सायकल देण्यात आली. द्वितीय-तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय महाजन, सचिव मनीष पिंपळे, प्रोजेक्ट चेअरमन अनिल बिल्लवा, प्रमुख पाहुणे दीपा पिंपळे, पोलिस निरीक्षक अनंत पराड, रोटरी सभासद जयेश आव्हाड, भगवान पाटील, स्मितेज पुरव, संतोष यादव, अमित राजपुरोहीत, हितेश जैन, नारायण गिरासे, गणेश गुघे, शैला महाजन उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.