"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप
esakal September 17, 2025 02:45 PM
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवसा अवजड वाहनांना घोडबंदर रस्त्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला, पण प्रत्यक्षात अजूनही ट्रक, टँकर व कंटेनर्स दिवसा धावत असल्याचे दिसते.

  • मंदार चोळकर यांनी त्यांच्या आजूबाजूच्या अवजड वाहनांचा उल्लेख करून आणि ट्रकच्या नंबर प्लेटवरून विनोदी भाष्य करत ट्रॅफिकच्या समस्येवर टीका केली.

  • खड्डे, अवजड वाहने आणि रस्त्यावरील अव्यवस्था यामुळे ठाणेकरांचे हाल होत असून, आदेशाचे पालन खरंच होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

  • Marathi News : ठाणे शहरातील घोडबंदर रस्ता हा कायमचा वर्दळीचा रस्ता. येथील ट्रॅफिक, खड्डे हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक कलाकारांनी यावर सोशल मीडियावर याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कलाकारांच्या पोस्टची दाखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेत घोडबंदर मार्गावर दिवसा अवजड वाहनांना वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले.

    अवजड वाहनांना रात्री 12 नंतर घोडबंदर रस्त्यावरून जाण्यास परवानगी देण्यात आली. पण नुकतंच गीतकार आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम चेतना भट्टचा नवरा मंदार चोळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती घोडबंदर रोडवर असल्याचं पोस्टमधून सांगितलं. काय म्हणाले ते जाणून घेऊया.

    "माननिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल रात्री तातडीने बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यासंदर्भात स्पष्ट आदेश देऊन ही संबंधित अधिकाऱ्यांचे अजून 12 वाजले नाहीत वाटतं ?

    कारण... माझ्या उजव्या बाजूला हरियाणाचा ज्वलनशील गॅस वाहून नेणारा टँकर आहे.

    त्याच्या पुढे जो ट्रक आहे त्याची नं. प्लेट जो कोणी वाचून दाखवेल त्याला नोबेल, ऑस्कर, ग्रॅमी इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करावं अशी मी देवा कडे प्रार्थना करेन.

    माझ्या मागे राजस्थान चा लांब च्या लांब कंटेनर आहे.

    डाव्या बाजूला मोठ्ठला खड्डा असल्याने आपलीच मोरी आणि मुतायची चोरी असलेल्या महाराष्ट्राच्या बिचाऱ्या छोट्या टेम्पो वाल्याला पुढे येता येत नाहीये.

    मी इच्छित स्थळी कधी पोहोचणार ते समोरच्या ट्रक मागे लिहिलेल्या નિલમ आणि વિરેન્દ્ર ला च माहित असावं कदाचित

    साला ह्यांच्या अमदावाद ने आमचा समधा बाद करून ठेवलाय.

    कदाचित आज रात्री पासून तरी दिलेल्या आदेशाचं पालन होईल ही भाबडी आशा आहे"

    सोशल मीडियावर यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत ठाणे महानगर पालिकांच्या कारभारावर टीका केली आहे. ही परिस्थिती कधी बदलणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    FAQs : 1. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणता आदेश दिला?

    दिवसा अवजड वाहनांना घोडबंदर रस्त्यावरून जाण्यास बंदी घालून, त्यांना रात्री 12 नंतरच परवानगी द्यावी असे आदेश दिले.

    2. हा आदेश का देण्यात आला?

    घोडबंदर रस्त्यावर कायम ट्रॅफिक, खड्डे आणि अवजड वाहनांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी.

    3. मंदार चोळकर यांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?

    आदेश असूनही दिवसा टँकर, ट्रक आणि कंटेनर्स रस्त्यावर असल्याची स्थिती त्यांनी विनोदी शैलीत मांडली.

    4. नागरिकांना मुख्य अडचणी कोणत्या आहेत?

    खड्ड्यांमुळे धोकादायक परिस्थिती, अवजड वाहनांची गर्दी, वाहतुकीत अडथळा आणि प्रवासाला लागणारा जास्त वेळ.

    5. पुढे काय अपेक्षा आहे?

    दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन होऊन रस्त्यावरील परिस्थिती सुधारावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा.

    ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये दिसणार हे मराठी कलाकार ! सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण
    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.