अस्मिता खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत सोमाटणेच्या स्वराला कांस्य पदक
esakal September 17, 2025 02:45 PM

सोमाटणे, ता. १६ : सातारा येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत सोमाटणेच्या स्वरा मुऱ्हे हिने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक मिळवले. क्रिडा मंत्रालय, वाको इंडिया फेडरेशन व किक बॉक्सिंग लिग महाराष्ट्र यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १२ वर्षांखालील व ४२ किलो वजनी गटात स्वाराने सहभाग घेतला होता. एकूण चार फेऱ्यांतील अटीतटीच्या लढतीत तिने दमदार कामगिरी करून चौथ्या फेरीअखेर कांस्य पदक पटकावले. स्वराच्या या यशामुळे मावळ तालुका व सोमाटणे परिसरात आनंदाचे वातावरण असून, नागरिकांनी तिचे अभिनंदन केले. स्वरा ही तळेगावच्या अरिंजय मार्शल आर्ट्सची विद्यार्थिनी असून, या आर्ट्सचे एकूण २० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

PNE25V50159
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.