मलायका अरोराचा खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, स्वत:वरच संशय…
Tv9 Marathi September 17, 2025 03:45 PM

मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती बोल्ट फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर तिने बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट केले. दोघे लग्न करणार असल्याचेही सांगितले. मात्र, त्यानंतर अर्जुनने मोठा खुलासा करत म्हटले की, मी सिंगल आहे. यावर मलायकाने सडेतोड उत्तर दिले. काही महिन्यांपूर्वी दोघे विभक्त झाले असून त्यांचे ब्रेकअप झाले. सध्या मलायका आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसतंय. ज्यावेळी अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले, त्यावेळी तिच्यासोबत खंबीरपणे अर्जुन उभा दिसला. ब्रेकपअनंतर दोघांमध्ये मैत्री शिल्लक आहे.

मलायका ही कायमच टीकेची धनी ठरते. तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या नात्यांमुळे. अर्जुन कपूर हा तिच्यापेक्षा वयाने छोटा असल्याने तिला कायमच टार्गेट केले गेले. आता मलायका अरोरा हिने थेट भाष्य केले. नुकताच मलायका अरोरा हिने हिंदुस्तान टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना तिने काही मोठी खुलासे केले. पहिल्यांदाच ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल इतके स्पष्टपणे बोलताना दिसली.

मलायका अरोरा हिने म्हटले की, या सर्व गोष्टी माझ्यासाठी सुरूवातीला फार जास्त कठीण होत्या. लोक मला मी कसे राहवे आणि काय करावे काय नाही हे सांगत. हेच नाही तर माझ्या कामापासून, कपड्यांपासून ते नातेसंबंधांपर्यंत मला बोलले जायचे. एकावेळेनंतर मी स्वत:ला समजून सांगण्याचे थांबवले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मला एकदम मोकळे वाटण्यास सुरूवात झाली. मला एक समजले की, तुम्ही स्वत:साठी तयार केलेले सर्व चांगले असते.

मलायका पुढे म्हणाली की, अरबाज खान याच्यापासून विभक्त झाल्यानंतर मला एक लेबल लावले गेले. मी खूप बोल्ड आहे, मी लोकांच्या तोंडावर बोलते असे माझ्याबद्दल सांगितले गेले. माझ्याबद्दल जेंव्हा खूप काही प्रश्न उपस्थित केले जातात, त्यावेळी बऱ्याचदा मला स्वत:वर संशय येतो. मुळात म्हणजे स्वत:वर संशय घेणे हा मानवी स्वभावच आहे. जो कधीच जात नाही. आयुष्यात असे बरेच दिवस आले की, मी स्वत:ला प्रश्न विचारले. गेल्या काही वर्षांत, मी त्या गोष्टी टीका म्हणून घेण्यापेक्षा अधिक सकारात्मकतेने नक्कीच घेतल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.