आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित दादा बीडमध्ये आहेत दादांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलीस ग्राउंडकडे जात होता. यादरम्यान दोन तरुणांनी अचानक ताफ्याच्या समोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदरील तरूण केज तालुक्यातील कुंभेफळ येथील आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं यावेळी तरुणांनी न्याय द्या, न्याय द्या अजित दादा न्याय द्या अशा घोषणा दिल्या.
Marathwada Live : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटपधाराशिव मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्राचे झाले वाटप
मुंडे अभिषेक व्यंकटेश, धाराशिव, प्रगती व्यंकटेश मुंडे, पूजा व्यंकटेश मुंडे, गणेश व्यंकटेश मुंडे सर्व राहणार धाराशिव यांना करण्यात आले वाट
Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळओबीसीवर अन्याय करू नका, असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला संभाजीनगरमध्ये आले होते. ते भाषण करण्यासाठी उभे राहिले, त्यावेळी काही लोकांनी जोरदार राडा घातला अन् घोषणाबाजी केली.
Flood News : पूरस्थितीमुळे सिरसाळा-पोहनेर मार्ग तीन दिवसांपासून बंदसिरसाळा : मंडळात मंगळवारी (ता. १६) सायंकाळी जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून खरिपातील सर्वच पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पूरस्थितीमुळे सिरसाळा-पोहनेर मार्ग तीन दिवसांपासून बंद आहे. अखिल भारतीय किसान सभेने पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व आर्थिक मदत देण्याची मागणी ॲड. अजय बुरांडे यांनी केली.
Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कारआंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे (वय ८३, रेवंता अपार्टमेंट, राजाराम रायफल्स परिसर) यांचे काल निधन झाले. ते दहा दिवसांपासून फुफ्फुसात जंतूंचा संसर्ग झाल्याने आजारी होते. त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारातून बरे झाल्यानंतर त्यांना चार दिवसांपूर्वी घरी आणण्यात आले होते. काल दुपारी साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी उमा, मुली वर्षा, विद्या व वीणा असा परिवार आहे. आज (ता. १७) सकाळी दहा वाजता कसबा सांगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Nitin Gadkari : भूगाव येथील बाह्यवळण रस्ता तातडीने करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देशपुणे-पौड-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील भूगाव येथील बाह्यवळण रस्त्याच्या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या कामाला अखेर गती मिळाली आहे. पुढील नऊ महिन्यांत या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले. त्यामुळे हिंजवडी, पिरंगुट, तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
Birendra Saraf : राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामामुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भातील हैदराबाद गॅझेटला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असताना या निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. सराफ यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे समजते. तथापि, राज्य सरकारच्या विनंतीचा मान राखत त्यांनी जानेवारीपर्यंत काम पाहण्याचे मान्य केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावर आज 'यात्री सेवा दिवस' साजरा केला जाणारशाहू नाका : कोल्हापूर विमानतळावर उद्या, बुधवारी ‘यात्री सेवा दिवस’ साजरा केला जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्याच्या उद्देशाने विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना विमानतळावर एक वेगळा आणि खास अनुभव घेता येणार आहे.
PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर 2025) 75 वा वाढदिवस (PM Modi Birthday) आहे. या निमित्याने देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
Maharashtra Rain : अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल २१ लाख सहा हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसानLatest Marathi Live Updates 17 September 2025 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर 2025) 75 वा वाढदिवस आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे (वय ८३, रेवंता अपार्टमेंट, राजाराम रायफल्स परिसर) यांचे आज निधन झाले. आज (ता. १७) सकाळी दहा वाजता कसबा सांगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल २१ लाख सहा हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. मागील चार दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाच लाख १३ हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील हैदराबाद गॅझेटला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असताना या निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूर विमानतळावर आज, बुधवारी ‘यात्री सेवा दिवस’ साजरा केला जाणार आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..