आशिया कप 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात पाकिस्तानने यजमान यूएईवर 41 धावांनी मात करत साखळी फेरीतील आपला दुसरा विजय मिळवला आहे. पाकिस्तानने यूएईला 147 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे यूएई हे विजयी आव्हान पूर्ण करत उलटफेर करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर यूएईला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने यूएईला 17.4 ओव्हरमध्ये 105 रन्सवर ऑलआऊट केलं. पाकिस्तान या विजयासह बी ग्रुपमधून टीम इंडियानंतर सुपर 4 मध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्ये लढत होणार आहे.