सुकीवली बौद्धवाडीत
होणार कमान
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १७ : तालुक्यातील सुकीवली बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीच्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम चाळके यांच्या हस्ते झाले. येथील कमानीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे रखडले होते; मात्र चाळके यांनी कमानीसाठी स्वतःची जमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे विकासकामाला गती मिळाली आहे. त्यांच्या या सामाजिक दायित्वपूर्ण कार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी सुकीवली बौद्धविकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष महेंद्र जाधव, स्थानिक अध्यक्ष श्रीपाल कांबळे, सरपंच रोशनी चाळके, माजी सरपंच विनायक निकम, पोलिस पाटील सुजाता जाधव आदींसह सुकीवली शाखा क्र. २५ चे पदाधिकारी, सदस्य व आम्रपाली महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होते. स्वप्नील जाधव यांनी सूत्रसंचालन केले. किरण जाधव यांनी आभार मानले.