INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी
esakal September 18, 2025 08:45 AM

India women cricket team injury update Jemimah Rodrigues : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन डे मालिकेचा दुसरा सामना आज खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रीग्ज हिला ताप आला आहे आणि त्यामुळे तिला उर्वरित दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय महिलांनी ठेवलेले २८२ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४४.१ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले होते. या सामन्यात जेमिमा रॉड्रीग्जने १८ धावांची खेळी केली होती. प्रतिका रावल ( ६४), स्मृती मानधना ( ५८) व हर्लीन देओल ( ५४) यांनी अर्धशतक झळकावली होती.

IND A vs AUS A: ऑसी फलंदाजाचे दमदार शतक, २२ चेंडूंत ९६ धावांचा पाऊस! सातव्या क्रमांकावर येऊन भारतीय गोलंदाजांना धुतले

बुधवारी दुसरा सामना खेळवला जातोय आणि त्याआधी जेमिमाला व्हायरल तापाने माघार घ्यावी लागली आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. जेमिमाच्या जागी संघात पुण्याच्या तेजल हसबनीस ( Tejal Hasabnis) हिची मुख्य संघात निवड केली गेली आहे. राखीव खेळाडू म्हणून तेजल संघासोबत होती. तेजलने भारताकडून ६ वन डे सामन्यांत एका अर्धशतकासह १४० धावा केल्या आहेत.

भारताचा सुधारित संघ - हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, प्रतिका रावल, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौड, सायली सातघरे, राधा यादव, श्री चरणी, स्नेह राणा, उमा चेत्री, तेजल हसबनीस; राखीव - प्रेमा रावत, प्रिया मिश्रा.

रोहित शर्माचे दोन 'भीडू' अजित आगरकरच्या टीममध्ये जाणार! आता बघू हिटमॅनला २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्यापासून कसे रोखणार
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.