संजय सूर्यवंशी
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात साडेसहा हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर अविरत पावसामुळे शेतातील पिके अजूनही पाण्यात असल्याने पूर्णतः खराब झाले आहेत. यामुळे शेतकर्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे नुकसानीची झळ बसत आहे. तर नांदेडजिल्ह्यात मागील महिनाभरापासून अविरत पाऊस पडत आहे. सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतांमध्ये तळ्याचे स्वरूप पाहण्यास मिळत असून सर्व पिके पाण्याखाली गेले आहेत. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना प्रशासनाकडून मात्र अजूनही पंचनामे करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
Nashik Crime : शेअर मार्केटमध्ये तोटा; दोघा मित्रांनी निवडला चोरीचा मार्ग, दोघेजण पोलिसांच्या ताब्यातशेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथील हे आहेत शेतकरी साहेबराव दुधमल यांना साडेतीन एकर शेती आहे. दोन एकरमध्ये सोयाबीन आणि दीड एकरमध्ये ऊस आहे. दुधमल यांचे दोन एकर मधील सोयाबीन अजूनही पाण्यात आहे. त्यांच्या हाती आता हे सोयाबीन लागणार नाही. दुधमल यांच्याप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची या पावसाने बेहाल केले आहेत. अजूनही या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकरीआता सरकारवर रोष व्यक्त करीत आहेत.
Jawhar News : हृदय पिळवटून टाकणारी घटना; मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बाबूंच्या झोळीचा आधारपावसाने शेतात पाणी साचले पिकांचे नुकसान
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पळाशीसह परिसरात दोन- तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. यामुळे कपाशी, मका, भुईमूग पिकांना फटका बसला आहे. तर मका आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.