स्टार प्रवाहने 16 सप्टेंबरला रात्री 11 वाजता ‘काजळमाया’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला, ज्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
मालिकेत अक्षय केळकर मुख्य भूमिकेत असून, निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली आहे.
प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, लवकरच ती स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काल 16 सप्टेंबरला स्टार प्रवाहने नवीन मालिका येणार असल्याची घोषणा पोस्टच्या माध्यमातून केली. रात्री उशिरा मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. प्रोमो पाहून प्रेक्षकही अवाक झाले असून अनेकांनी चॅनेलचं कौतुक केलं आहे.
स्टार प्रवाहवर काजळमाया या नवीन मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला. रात्री 11 वाजता हा प्रोमो शेअर करण्यात आला होता. या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय एक तरुण इमारतीचे जिने चढतोय आणि कुणीतरी त्याचा पाठलाग करतंय पण त्याला हे माहित नाही. तो पुढच्या मजल्यावर जातो तेव्हा त्याला त्याचा कुणीतरी पाठलाग करतंय असं वाटतं. तो खालच्या पायऱ्यांकडे वाकून पाहतो पण तिथे कुणीच नसतं. तो स्वतःशीच हसून वर जातो तेव्हा एक बाई जी गायब झालेली असते ती पुन्हा प्रकट होते.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
अक्षय केळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तर शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. लवकरच ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.
"आता पर्यन्त चा स्टार प्रवाह चा हटके कन्सेप्ट वाटतोय शेवंता सारखं नक्की च hit असेल हे cast",बरं झालं नवीन मालिका आली नाहीतर आज काल स्टार प्रवाह वरती सिरीयल मध्ये फक्त एवढेच दाखवतायेत छोटी जाऊन त्रास देते दीड चिडतो दिराची भांडण ह्याच पितळ उघडा टाका त्याचे उघडे टाका आणि शेवटी परत त्यालाच घरात घ्या ते सायली पण तसेच आणि ती जानकी पण तशीच कोणत्या सिरीयल अशा बघण्यासारखे राहिले नव्हते चांगली सिरीयल येते असं वाटतंय आता","congratulationsआत्ता प्रवाहाचा वेग वाढणार!!!!!!!!!! मराठी television वर प्रयोग होऊ लागलेत तर" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.
FAQs :Q1. ‘काजळमाया’ ही मालिका कोणत्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे?
➡️ स्टार प्रवाह.
Q2. या मालिकेचा प्रोमो कधी रिलीज झाला?
➡️ 16 सप्टेंबरला रात्री 11 वाजता.
Q3. मालिकेत मुख्य भूमिकेत कोण आहे?
➡️ अक्षय केळकर.
Q4. या मालिकेची निर्मिती कोणी केली आहे?
➡️ शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई.
Q5. प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोला कसा प्रतिसाद दिला आहे?
➡️ प्रेक्षकांनी प्रोमोचं कौतुक केलं असून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.