सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अॅग्रीमेंट झाले. याचा अर्थ म्हणजे जर पाकिस्तानवर हल्ला झाला तर तो सौदी अरेबियावर झाल्यासारखा आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतातील पर्यटकांना टार्गेट करत मोठा हल्ला पहलगाममध्ये केला. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि भारतीय लष्कराने या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातूनही जोरदार उत्तर दिले. हेच नाही तर पाकिस्तानात घुसून थेट दहशतवाद्यांची अड्डे उद्धवस्थ केली. या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचे अख्ख्ये खानदान मारले गेले. पहलगाममध्ये हल्ल्यात फक्त आणि फक्त हिंदू पर्यटकांना दहशतवाद्यांनी टार्गेट केले.
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स करारावर भारत लक्ष ठेऊन आहे. आता नुकताच भारताने आपली भूमिका देखील जाहीर केलीये. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, हा करार आम्हाला आधीच माहित होता. राष्ट्रीय सुरक्षा, प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेसाठी हा करण्यात आला. मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावर थेट भाष्य केले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, दोन्ही देशांमधील दीर्घकालीन नात्याला आता औपचारिक स्वरूप देण्यासाठी हे पाऊल उचण्यात आलंय. प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्या सुरक्षेला प्राधान्य देईल यावर बोलताना जयस्वाल हे दिसले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, असा विश्वास आहे की, या करारामुळे दक्षिण आशियाच्या जटिल भू-राजकीय परस्थितीवर परिणाम होऊ शकतो, या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या एका छोट्या युद्धानंतर.
सौदी अरेबियाचे भारतासोबत व्यापार आणि गुंतवणूक यासह मजबूत आर्थिक संबंध आहेत, तर पाकिस्तानशी त्यांचे लष्करी संबंध 1960 पासून आहेत. मात्र, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील करारानंतर भारताने स्वत:च्या सुरक्षेवर अधिक भर देण्याची भूमिका घेतली आहे. पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ज्याप्रकारे पाकिस्तानात घुसून कारवाई केली, त्यानंतर पाकिस्तानचे चांगलचा घाबरला असून त्यांनी थेट सौदी अरेबिया पुढे आपल्या सुरक्षेसाठी लोटांगण घातल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.