आपल्या आहारात फळे असणे अत्यंत चांगले असते. विशेष करून डॉक्टर त्या त्या हंगामात येणारी फळे अवश्य खावीत असे सांगतात. कारण फळांमध्ये शरीराला आवश्यक असलेल्या बहुतांश पोषक घटकांपैकी अनेक पोषक घटक असतात. याशिवाय यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचा समावेश असतो. मात्र फळांच्या सेवनात एक जोखमीचा घटक असू शकतो, तो म्हणजे शर्करा अर्थात शुगर कंटेंन. या शुगर कंटेनमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डायबिटीस रुग्णांनी सरसकट फळे खाऊ नयेत, असे डॉक्टर सांगतात. चला तर मग जाणून घेऊयात डायबिटीस रुग्णांनी कोणती फळे खाऊ नयेत.
अंजीर –
अंजीर विविध पोषकतत्वांनी परिपूर्ण असे फळ आहे. पण, डायबिटीस रुग्णांनी ते खाऊ नये. कारण अंजीराचे सेवन केल्याने रक्तातल्या साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे बहुतांश डॉक्टर अंजीर न खाण्याच्या सल्ला देतात.
चेरी –
अनेकांच्या आवडीचे फळ चेरी आहे. एका चेरीत साधारणपणे 20 ग्रॅम साखर असते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रुग्णांनी चेरी खाऊ नये.
हे ही वाचा – Health Tips: चुकूनही माशाबरोबर खाऊ नयेत हे पदार्थ
द्राक्ष –
एक कप द्राक्षामध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तीने द्राक्ष खाणं धोक्याचे ठरू शकते.
आंबा –
आंबा हे सर्वाच्या आवडीचे फळ आहे. यात तंतुमय पदार्थ अर्थात फायबरचे प्रमाण अधिक असते. मात्र, यात साखरही असते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तीने आंब्यापासून दूर राहावे.
केळी –
केळी खाल्ल्याने साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे डॉक्टर डायबिटीस असलेल्या व्यक्तीने केळी खाऊ नयेत असे सांगतात.
हे ही वाचा – Baby Care: तुम्ही वापरात असलेल्या परफ्यूममुळे चिमुकल्यांना होतायत श्वसनाचे त्रास