योग गुरूनेच अल्पवयीन मुलीसह ८ महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. योग गुरू निरंजन मूर्ति यांच्या विरोधात १७ वर्षीय पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर योग गुरू निरंजन मूर्तीला अटक करण्यात आलीय. कर्नाटकातील बंगळुरूत हा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, योग गुरू निरंजन मूर्ती हा राजराजेश्वरी नगर इथं योगा केंद्र चालवतो. त्याच्यावर आऱोप आहे की, योग केंद्रात आलेल्या अल्पवयीन पीडितेसह ८ महिलांवर बलात्कार केला. पीडितेच्या आरोपांमुळे आता खळबळ उडाली आहे.
Crime: धक्कादायक! आधी व्हिडिओ बनवला, नंतर महिला जिम थेरपिस्टने ऑल आउट प्यायलं, संतापजनक कारण समोरएका १७ वर्षीय मुलीला योग गुरूने त्याच्या जाळ्यात ओढलं. तिच्यावर अत्याचार केले. यानंतर मुलीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार केल्याचं निष्पन्न झालं. यानंतर योग गुरू निरंजन मूर्तिला अटक करण्यात आलीय. मुलीच्या तक्रारीनंतर पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आता त्याला शोधून अटक केलीय.चौकशीत समोर आलं की मुलीवर त्यानं बलात्कार केला होता. याशिवाय इतरही काही मुली आणि महिलांवर बलात्कार केला आहे. आता या प्रकरणी पुढील तपास केला जात आहे.
योग गुरूने आणखी कुणावर अत्याचार केले का? यात त्याच्यासोबत आणखी कोण होते का? याचा तपास करण्यात येत आहे. योग गुरूने कोणावर अत्याचार केले असतील तर पोलिसात तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.