मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, मोठा विमान अपघात टळला, घातपात की आणखी काही?
GH News September 19, 2025 12:15 AM

ब्लूमवर्गच्या एका रिपोर्टनुसार मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पत्नी मेलेनिया यांच्यासोबत ब्रिटनला जाण्यासाठी विमानानं उड्डान केलं होतं. त्याचवेळी स्पिरिट एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान त्यांच्या विमानाच्या खूपच जवळ आलं होतं. कोणत्याही क्षण धडक होऊ शकते अशी स्थिती होती, मात्र एअर कंट्रोलरने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा विमान अपघात टळला आहे. एअर कंट्रोलरने स्पिरिट एअरलाइन्सच्या पायलटला आपलं विमान वळवून टॅब सोडण्याच्या सूचना पाठवल्या, त्यामुळे मोठा विमान अपघात टळला, या अपघातामधून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी थोडक्यात बचावले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आणि स्पिरिट एअरलाइन्सच्या विमानामध्ये फार थोड अतंर राहिलं होतं. मात्र एअर कंट्रोलर टीमच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. कंट्रोलर टीमकडून स्पिरिट एअर लाइन्सच्या पायलटला तातडीचे संदेश पाठवण्यात आले. तुमच्या पाठीमागे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं 747 विमान आहे, फार थोडं अंतर राहिलं आहे, त्यामुळे तुम्ही आता 20 डिग्री उजवीकडे वळा, जेणेकरून दोन्ही विमानांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. दरम्यान याबाबत बोलताना स्पिरिट विमानाच्या प्रवक्त्याने सांगितलं की आम्हाला एअर कंट्रोलर टीम कडून ज्या-ज्या सूचना मिळाल्या त्याचं आम्ही व्यवस्थित पालन केलं, सर्व प्रवाशांना घेऊन आम्ही सुखरूप पोहोचलो आहोत.

ट्रम्प यांच्याकडे कोणतं विमान

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे बोइंग-747 चे दोन विमानं आहेत. ज्याचा कोड 28000 आणि 29000 आहे. या विमानांना हवाई दलाचे पदनाम VC-25A आहे. ट्रम्प यांच्यासाखी राखीव असलेल्या या स्पेशल विमानांना एअर फोर्स वन असे नाव देण्यात आले आहे. एअर फोर्स वन हे एक तांत्रिक नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या विमानाला अमेरिकेचा ध्वज आणि चिन्ह लावतात, पांढऱ्या कलरची ही दोन्ही विमाने हवेत इंधनाचा भरणा करण्यासाठी सक्षम आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. एअर कंट्रोलर टीमच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. ट्रम्प हे ब्रिटनकडे निघालेले असताना ही घटना घडली   आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.