अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफने जगाचे धाबे दणाणले आहेत. अनेक कंपन्यांची झोप उडाली आहे. परंतू या संकटाच्या घडीतही भारताच्या टाटा ग्रुपने संधी शोधत 23000 कोटींची बंपर कमाई केली आहे. या टाटा ग्रुप कंपनीने संकटाच्या या घडीत कशी काय इतकी तुफान कमाई केली याचे जगाला कोडे पडले आहे. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूयात…
वास्तविक टाटा इलेक्ट्रॉनिक्स ( Tata Electronics ) ने iPhone निर्यात करुन रेक्रॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. कंपनीने सांगितले की आर्थिक वर्षे (FY25)मध्ये तिच्या एकूण कमाईचा सुमारे 37% भाग केवल अमेरिकेला आयफोन पाठवल्याने आला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने अमेरिकेतूनच तब्बल 23,112 कोटींची कमाई केली आहे. आता सवाल हा आहे की ही कमाई केली कशी ?
ट्रम्प प्रशासनाने चीनवरुन येणाऱ्या सामानावरही मोठा टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. यापासून वाचण्यासाठी Apple कंपनीने चीनवर अवलंबित्व कमी करुन भारतातील आयफोनचे उत्पादन वाढवले. त्या संधीचा फायदा टाटा इलेक्ट्रॉनिक्सने घेतला. आणि भारतात आयफोन निर्मितीच्या फॅक्टरी स्थापन केल्या. आता जेव्हा Apple ने चीनवरुन त्यांचे प्रोडक्शन शिफ्ट करण्यास सुरुवात केली तसा याचा थेट लाभ टाटा कंपनीच्या पदरी पडला.
अमेरिकेनंतर टाटा इलेक्ट्रॉनिक्ससाठी दुसरी मोठी बाजारपेठ आयर्लंड राहीला. येथे कंपनी 14,255 कोटींची (23%) कमाई केली आहे. युरोपमध्ये Apple चा बेस देखील आयर्लंड आहे. याशिवाय तैवानहून 15% आणि भारतातून 20% ची कमाई झाली आहे. ही माहिती कंपनीने Registrar of Companies (RoC) ला दिली आहे.
टाटा कंपनीच्या कमाईत एप्पलचा वाटा सतत वाढत आहे. बातम्यानुसार ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकी आधीच एप्पलने अमेरिकेसाठी आयफोनचे उत्पादन चीनहून भारतात शिफ्ट करणे सुरु केले होते. आधी टाटा इलेक्ट्रॉनिक्स केवळ तैवान आणि भारतात आयफोन पुरवठा करत होती, परंतू आता अमेरिका तिचा सर्वात मोठा ग्राहक झाला आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिक्सने भारतात दोन फॅक्टरीत आयफोनची निर्मिती सुरु केली आहे. यातील एक फॅक्टरी Wistron ची आहे. तिला टाटाने मार्च 2024 रोजी विकत घेतले आणि तिचे नाव बदलून टाटा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्स सॉल्युशन्स ठेवले.आता ही कंपनी संपूर्णपणे टाटाच्या मालकीची आहे.
RoC आकड्यांनुसार जानेवारी 2024 ते मार्च 2025 ( 15 महिने ) दरम्यान टाटा इलेक्ट्रॉनिक्सने 75,367 कोटींची कमाई केली आहे. तर 2023 रोजी हा आकडा केवळ 14,350 कोटी होता. म्हणजे केवळ दोन वर्षात कमाई पाच पट वाढली आहे. 2023 मध्ये कंपनीचा नफा 36 कोटी होता. तो आता वाढून 2,339 कोटी रुपये झाला आहे.