गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये मोठ्या दणक्यात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या लाटेत महायुतीचे सरकार भरघोस मतांनी निवडून आले. पण त्यानंतर या योजनेत सातत्याने नवनवीन निकष लागू करण्यात येत आहेत. या नवीन निकषांनी सरसकट अंमलबजावणीचे आदेश कधीच मागे टाकले आहेत. या योजनेत काही पुरुषांनी घुसखोरी केल्याचे तसेच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर आता सरकारने या योजनेसाठी निकषांची जंत्रीच सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आता सरकारने ईकेवायसी (ladki bahin yojana ekyc) अनिवार्य केली आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. कशी करणार ही प्रक्रिया?
ई-केवायसीसाठी इतकी मुदत
लाडकी बहीण योजनेविषयी सरकार दरबारी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अर्थात ई-केवायसी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे. कारण आता सणासुदीचे दिवस आहेत. महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. त्यामुळे पात्र महिलांनी फार काळ ही प्रक्रिया रेंगाळत न ठेवता तातडीने ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी.
अशी करा e-kyc