India A vs Australia A , 1st Unofficial Test Match: भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेट गमवून 532 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने तोडीस तोड उत्तर दिलं. भारतीय संघ 7 गडी गमवून 531 धावा केल्या आणि डाव घोषित केला. यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. भारताच्या हातात तीन विकेट होत्या आणि 1 धाव आरामात करू शकले असते. मग 1 धाव आधीच डाव घोषित करण्यात काय अर्थ होता. कर्णधार श्रेयस अय्यरच्या या निर्णयाची चर्चा रंगली आहे. कारण टीम इंडिया या सामन्यात आरामात लीड घेऊ शकली. पण भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला फलंदाजीसाठई बोलवलं. पण यातून काही वेगळं असं सिद्ध झालंच नाही. उलट हा सामना ड्रॉ झाला.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात 7 गडी गमवून 531 धावा केल्या होत्या. यावेळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ट्री ब्रेक घ्यावा लागला. या सामन्यात शेवटच्या सत्रात काही खास होईल आणि सामना पालटेल असं काही चित्र नव्हतं. पण तरीही कर्णधार श्रेयस अय्यरने डाव घोषित केला. तसेच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करणं भाग पाडलं. पण या रणनितीचा टीम इंडियाला फार काही फायदा झाला नाही. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 56 दावा केल्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ करण्याशिवाय पर्यायच नव्हता.
कसोटी सामन्यात एकूण चार फलंदाजांनी शतकी खेळी केली. यात ऑस्ट्रेलियाकडून 2, भारताकडून 2 फलंदाजांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात सॅम कोन्स्टासने 144 चेंडूत 109 धावांची खेळी केली. तर फिलिपने 87 चेंडूत नाबाद 123 धावा ठोकल्या. भारताकडून देवदत्त पडिक्कलने 281 चेंडूत 150 धावा केल्या. तर ध्रुव जुरेलने 197 चेंडूत 140 दावांची खेळी केली. श्रेयस अय्यर या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याचा डाव फक्त 8 धावांवर आटोपला.