टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेनंतर ऑक्टोबर महिन्यात मायदेशात वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र त्याआधीच हिटमॅन रोहितची बॅट मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या माध्यामातून तळपणार आहे. हे कसं शक्य आहे? जाणून घेऊयात.
अंडर 19 टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. काही दिवसांनी अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेला 21 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आयुष म्हात्रे भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. आयुष या मालिकेत रोहितच्या बॅटने खेळताना दिसणार आहे.
आयुष म्हात्रे याने अवघ्या काही वर्षांत तडाखेदार कामगिरीच्या जोरावर 19 वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळवलं. इतकचं नाही तर आयुष सार्थपणे नेतृत्वाची धुराही सांभाळतोय. आयुषने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आता आयुष ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहितच्या बॅटने धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनिअर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आयुषला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बॅट भेट दिली.आयुषने रोहितसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. “रोहित दा ने (मोठा भाऊ) आपल्याला बॅट भेट दिली. ही बॅट फक्त गिफ्ट नाही. ही बॅट प्रेरणा देण्याचं काम करेल”, असं कॅप्शन आयुषने या फोटोला दिलंय.
दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 5 सामने खेळणार आहे. अंडर 19 इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात होणार आहे.
पहिला सामना, 21 सप्टेंबर, ब्रिस्बेन
दुसरा सामना, 24 सप्टेंबर, ब्रिस्बेन
तिसरा सामना, 26 सप्टेंबर, ब्रिस्बेन
एकदिवसीय मालिकेनंतर उभयसंघात 4 दिवसांचे 2 सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे.
पहिला सामना, 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, ब्रिस्बेन
दुसरा सामना, 7 ते 10 ऑक्टोबर, मकॉय
आयुष म्हात्रेची इंस्टा स्टोरी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अंडर 19 टीम इंडिया : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह (विकेटकीपर), आरएस अम्बरीश, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, डी दीपेश, किशन कुमार, अनमोलजीत सिंह, खिलान पटेल, उधव मोहन आणि अमन चौहान.