Sangli Politics : जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांच्या आत्महत्येशी माझा, माझ्या पीएचा, सुनील पवार यांचा कोणताही संबंध नाही. मी बहुजन मागास समाजातून येत असल्यानेच माझ्या बदनामीचे कुभांड जयंत पाटील यांनी रचले आहे. त्याला माजी आमदार विलासराव जगताप व विक्रम सावंत यांची फूस असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज केला. आमदार पडळकरांची बदनामी केल्याच्या निषेध म्हणून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी जत पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. यावेळी मोर्चासमोर ते बोलत होते.
आमदार पडळकर म्हणाले, ‘‘वडर यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करावी, अशी माझीच मागणी असून मी यासाठी जत पोलिसांना भेटणार आहे. त्यांनी सत्य बाहेर आणावे.त्यानंतर मी एकालाही सोडणार नाही. मी शांत होतो, पण आता तुम्ही इतक्या घाणेरड्या पातळीवर उतरला असाल तर आता सर्वांचाच हिशेब होईल. ’एखाद्या तरुण अधिकाऱ्याची आत्महत्या दु:खदायक आहे. मात्र, त्याला घाणेरड्या राजकारणाची जोड देण्यात आली आहे. यापूर्वी मला प्रस्थापितांनी खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकलेय.आता मी तुमच्या सगळ्या भानगडी बाहेर काढणार आहे.’’
आमदार जयंत पाटील, विलासराव जगताप आणि विक्रम सावंत यांच्यावर टीकेचे आसूड ओढत आमदार पडळकर यांनी बिनडोक राजकारणी असा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘एक राज्याचे नेतृत्व करायला निघाला तर दुसरा संत व्हायला निघाला आहे. त्यांचे आचरण तालुक्याला माहीत आहे. एकाने कारखाना उभारतो म्हणून दहा वीस हजार एकराने जमिनी लाटल्या; पण कारखाना तर काढलाच नाही. आता त्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी माझा लढा असेल. शेतकऱ्यांनी प्रांत, तहसीलकडे अर्ज करावेत.’’
View this post on InstagramA post shared by Jitendra Awhad (@jitendra.awhad)
डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, ‘‘निवडणुका असल्याने तालुक्यात राजकारण सुरू आहे. परंतु जनता विकासाच्याच मागे राहील.’’ सुनील पवार म्हणाले, ‘‘वडर माझे चांगले मित्र होते. माझ्या कुटुंबातील सदस्य गेल्याइतकेच मला दुःख आहे. मी कोणत्याही चौकशीस सामोरे जाईन.’’ मोर्चात आकाराम मासाळ, सरदार पाटील, आण्णा भिसे, संतोष मोटे, अप्पासाहेब नामद, नाथा पाटील, रवि मानवर, परशुराम मोरे, विट्टल निकम, मिलिंद पाटील, दिग्विजय चव्हाण, रमेश देवर्षी, सोमनिंग बोरामणी, रमेश बिराजदार, अभिजित चव्हाण, आशिष शिंदे, अतुल मोरे, प्रकाश मोटे, सचिन सरगर, जोती घाडगे, संगीता लेंगरे, विनोद पवार, तम्मा कुलाळ, प्रवीण वाघमोडे, लक्ष्मण जखगोंड, अनिल पाटील, बसवराज चव्हाण, हिंदुराव शेंडगे आदी सहभागी झाले.
Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वादपडळकरांची जीभ घसरली
नेहमी वादग्रस्त विधाने करणाऱ्या आमदार पडळकर यांनी आज पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जात विधाने केली. कौटुंबिक पातळीवर जात त्यांनी केलेली विधाने समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर नाराजी व्यक्त होत आहे.