Hingoli Crime : भेंडेगावमध्ये दोन गटात वाद; वाहनांची तोडफोड करत केली मारहाण
Saam TV September 20, 2025 08:45 AM

हिंगोली : रात्रीच्या सुमारास हिंगोलीच्या भेंडेगावमध्ये दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता. काहीतरी क्षुल्लक कारणातून शिवीगाळ केल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेल्यावरून वाद निर्माण झाला होता. यात दोन गट आमनेसामने आले असता यात काहींनी वाहनांची तोडफोड करत मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला आहे. यामुळे गावात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

हिंगोलीजिल्ह्यातील भेंडेगाव येथे रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दरम्यान एका व्यक्तीचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तरुणांनी याचा जाब विचारण्यासाठी त्या व्यक्तीचे घर गाठले. मात्र तिथे इतर काही तरुण आले असता सुरुवातीला शाब्दिक वाद झाली. यातून निर्माण झालेल्या वादात गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. यानंतर वाद अधिकच वाढत गेला होता. 

Pune Crime News: ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, राजस्थानी अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांची कारवाई

गावात पोलीस पथक तैनात 

या प्रकारानंतर दोन्ही गटातील नागरिकांनी कुरुंदा पोलीस स्टेशन गाठत एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर हिंगोलीचे पोलीसअधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रात्री उशिरा घटनास्थळाला भेट देत नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. भेंडेगावमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे.

Kalyan : कल्याणमध्ये सोसायटी घोटाळा; कॉमन स्टिल्ट पार्किंग विक्री प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल

हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू; निषेधार्थ लासलगाव बंद
एकतर्फी प्रेम प्रकरणाच्या संशयातून नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात कुंदन नरेश चावरिया हा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली, कुंदन चौवरिया यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ नातेवाईक व मित्र परिवाराने लासलगाव बंदची हाक दिली या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहेत अचानक झालेल्या या बंदमुळे बाजारपेठ शुकशूकाट दिसत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.