परंदवडीतील इंदिरा कॉलेजमध्ये 'डिझास्टर शिल्ड २०२५' कार्यशाळा
esakal September 20, 2025 08:45 AM

ऊर्से, ता. १९ : परंदवडी येथील इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये स्टुडंट डेव्हलपमेंट सेलच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या सहकार्याने ‘डिझास्टर शिल्ड २०२५’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत फर्स्ट एड व प्री-हॉस्पिटल ट्रीटमेंट, आपत्कालीन परिस्थितीत तयार होणारे तात्पुरते राफ्ट्स व बुआयज तसेच भूकंप, पूर व आग या संदर्भातील आपत्कालीन तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. निलेश उके यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. हा उपक्रम स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफिसर विजयकुमार सैनी व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली तसेच एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रवीण चरडे यांच्या पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.