Amit Shah: तर घुसखोरी वाढेल : अमित शहा; जनतेपर्यंत सत्य पोहोचण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला
esakal September 20, 2025 06:45 AM

पाटणा : ‘‘विरोधकांकडून मतचोरीचे खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेला सत्य सांगावे आणि त्याबरोबरच विरोधकांची राज्यात सत्ता आल्यास घुसखोरीला बळ मिळेल, असेही सांगावे,’’ असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले.

बिहारमध्ये भाजप आघाडीला साधा विजय नको, तर प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असेही शहा म्हणाले. अमित शहा यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्या शिबिरात मार्गदर्शन केले.

ते म्हणाले,‘‘बिहारमधील विधानसभेच्या २४३ जागांपैकी बहुतांश जागा भाजप आणि मित्रपक्षांसाठी मिळविणे हेच आपले लक्ष्य असायला हवे. गेल्याच महिन्यात राहुल गांधी यांची मतदार अधिकार यात्रा झाली. बांगलादेशमधून घुसखोरी करून आलेल्यांचा बचाव करण्यासाठीच हा प्रयत्न होता.

अशा घुसखोरांना मतदानाचा अधिकार का द्यावा? नागरिकांना ज्या सुविधा मिळतात, त्या सुविधा या घुसखोरांना का द्याव्या? राहुलबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घुसखोर हवेच आहेत, कारण ती त्यांची मतपेढी आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील प्रत्येक घराला भेट द्यावी आणि विरोधकांची सत्ता आल्यास घुसखोरी वाढेल, हे मतदारांना पटवून द्यावे.’’

Supriya Sule : माझ्या पांडुरंगाला मटण चालतं, तर तुम्हाला काय अडचण?; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल ‘आरक्षण जाणार नाही’

अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने केली आहे. याचाही समाचार अमित शहा यांनी घेतला. भाजपचा एक जरी खासदार संसदेत आहे, तोपर्यंत आम्ही हे आरक्षण रद्द होऊ देणार नाही, अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.