शेअर बाजारात एका बाजूला घसरण सुरू असली तरी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येतेय. यामुळे ग्रुपच्या बाजार भांडवलात ४६ हजार कोटींची वाढ झालीय. सेबीने हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणी अदानी ग्रुपला क्लीन चिट दिलीय. त्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून आलंय. याचा सर्वाधिक फायदा एनआरआय गुंतवणूकदार राजीव जैन यांना झाला. त्यांची कंपनी GQG पार्टनर्सने अदानी ग्रुपच्या विविध कंपन्यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक केलीय.
अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स, अदानी पावर आणि अदानी ग्रीन एनर्जी यात गुंतवणूक आहे. या शेअर्समध्ये आज ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने राजीव जैन यांच्या कंपनीला १ हजार ८४० कोटींचा फायदा झाला. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये GQG पार्टनर्सची गुंतवणूक ४९ हजार १७२ कोटींवर पोहोचलीय. एक दिवस आधी ती ४७ हजार ३३३ कोटी रुपये इतकी होती.
GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...जानेवारी २०२३मध्ये अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपविरोधात एक रिपोर्ट जारी केला होता. यानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले होते. तेव्हा GQGने अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती. अदानी पावरमध्ये त्यांनी 945.55 कोटी, अदानी एंटरप्रायजेसमध्ये ४१५.७२ कोटी, अदानी पोर्ट्समध्ये २०५ कोटी, अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये १४७ कोटी आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये १२४ कोटी रुपये इतका नफा कमावला.
अदानी एंटरप्रायजेसचा शेअर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ३.८८ टक्क्यांसह २ हजार ४९५ रुपयांवर होता. दिवसअखेर तो ३८०१ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते अदानी विल्मरची किंमत ३६० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मोतीलाल ओसवाल यांनी अदानी पोर्ट्सची किंमत १७०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केलीय.