GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...
esakal September 20, 2025 12:45 PM

GST 2.0 brings major relief for car buyers : केंद्र सरकारने नवे जीएसटी दर जाहीर केले आहेत. २२ सप्टेंबर पासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यानुसार आता ५ आणि १८ टक्के असे दर असतील. त्यामुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार असून त्याचा फायदा ग्राहकांनी होणार आहे. जीएसटी दरकपातीच्या या पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांच्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत. मात्र, जीएसटीमधील दरकपातीचा फायदा जुनी कार खरेदी करताना मिळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

खरं तर सेकंड हॅंड कारवरील जीएसटी दरात (१८ टक्के) कोणताही बदल झालेला नाही. मात्र, तरीही, स्पिनीने त्यांच्या गाड्यांच्या किमतीत कपात करून खरेदीदार आणि विक्रेत्यांना फायदा करून देण्याचा निर्णय घेतला आहे. स्पिनीच्या या निर्णयांतर आता खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांना २ लाखांपर्यंत सूट तर गाडी विक्री करणाऱ्यांना २०,००० रुपयांपर्यंत फायदा मिळण्याची शक्यता आहे.

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

स्पिनीने जीएसटी दर कपातीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. स्पिनीने स्पष्ट केले आहे की, सेकंड हॅंड कारवरील जीएसटी दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु, ऑटो क्षेत्रातील व्यापक बदलांच्या पार्श्वभूमीवर आम्ही गाड्यांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा बाजारात सेकंड हॅंड गाड्यांची मागणी कायम राखण्यासाठी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Premium| GST Cuts: जीएसटीतील बदलांचा आणि परराष्ट्र संबंधांचा निवडणूक राजकारणावर काय परिणाम?

यासंदर्भात बोलताना स्पिनीचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड हनीश यादव म्हणाले, "स्पिनीसाठी ग्राहक ही नेहमीच प्राथमिकता राहिली आहे.पारदर्शिता आणि विश्वास याच्याशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, आमच्या निर्णयाचा फायदा आता हजारो ग्राहकांना होणार आहे''

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.