"मस्तानी तलाव" हे नाव कसं पडलं?
esakal September 21, 2025 02:45 AM
मस्तानी तलाव

पुण्याजवळच्या दिवेघाटात वसलेला मस्तानी तलाव, निसर्ग आणि इतिहासाचा अद्भुत संगम आहे. या तलावाचं नाव मस्तानीबाईंच्या आठवणींनी अजरामर झालं आहे.

डोंगर-दऱ्यांच्या कुशीत विसावलेला तलाव

वडकी गावाजवळचा हा तलाव, पावसाळ्यात हिरवाईने नटतो. या निसर्गरम्य ठिकाणी बसून शांततेचा अनुभव घेता येतो.

प्रेमाची साक्ष देणारा तलाव

असे म्हणतात, थोरले बाजीराव पेशवे मस्तानीबाईंना घेऊन इथे विश्रांतीसाठी यायचे. तलावाच्या तीरावर त्यांच्या सहवासात क्षण घालवत असत.

१४ एकरात बांधलेली भव्य जलवास्तू

बाजीरावांनी तलाव बांधण्याआधी संपूर्ण परिसराचा अभ्यास केला होता. पाऊस, प्रवाह, खोऱ्यांची दिशा यांचा विचार करून तलावाची रचना करण्यात आली.

तलावाच्या भिंती किल्ल्याइतक्या भक्कम

सहा ते बारा फूट जाडीच्या भिंती, तीन बुरुज, ओटे, कोनाडे, आणि भुयारी मार्ग याने सजलेला हा तलाव कलेचं प्रतीक आहे.

इतिहास सांगणाऱ्या मंदिरे आणि मूर्ती

तलावाजवळ गणेश, हनुमान आणि महादेवाची मंदिरे असून, उघड्यावर काही मूर्ती आहेत. इथे पूर्वी महाल होता, त्याचे खांब अजूनही शिल्लक आहेत.

पावसाळ्यात खुलणारा तलाव

पावसाळ्यात तलावात पाणी भरते, हिरवाई फुलते आणि हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. पक्ष्यांचा किलबिलाट आणि लाटांचे संगीत मन मोहून टाकतात.

स्मरणात राहणारी सफर

मस्तानी तलाव केवळ निसर्ग किंवा इतिहास नाही, तर आपल्याला आपल्या वारशाची जाणीव करून देणारा एक जीवंत अनुभव आहे. इथे जरूर भेट द्या!

‘टच वुड’ म्हणजे नेमके काय? जाणून घ्या रंजक इतिहास! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.